कुरआनने जगाला काय दिले?

 इस्लामी कॅलेंडरचा ९ महिना असणाऱ्या रमजानचे महत्व अनन्यसाधारण आहे. हा कुरआन अवतरणाचा महिना. कुरआन इस्लाम धर्म, संस्कृती आणि परंपरांचा आधार. मानवी इतिहासात या सारखा दुसरा ग्रंथ आढळत नाही. या ग्रंथाने एका नव्या युगाला, नवसभ्यतेला, नवसंस्कृतीला जन्म दिला. या ग्रंथाने मानवी जीवनाचा प्रवाह बदलला.

या ग्रंथाने मानवाला मानवाच्या गुलामीतून मुक्त केले. काळ्यांना गोऱ्यांच्या गुलामीतून मुक्त केले. स्त्रीला पुरुषाच्या गुलामीतून मुक्त केले. प्रजेला शासकाच्या गुलामीतून मुक्त केले. गुलामांना मालकांच्या गुलामीतून मुक्त केले.
या ग्रंथाने धर्माची परिभाषा बदलून टाकली. निर्माता आणि निर्मितीच्या दरम्यान असणारी पुरोहित संस्था नष्ट केली. मानवाला त्याच्या पालनकर्त्याशी जोडले. धर्मग्रंथ सर्वांसाठी उघडी केली. प्रार्थना स्थळे सर्वांसाठी उघडली. धर्म शिक्षण सर्वांसाठी खुले केले. धर्मज्ञानाचा अभ्यासक आणि पंडित होण्याची सर्वांना समान संधी दिली.
या ग्रंथाने समानतेचे व्यवहारिक प्रात्यक्षिक करून दाखवले. काळे गोरे समान केले. स्त्री पुरुष समान केले. मालक गुलाम समान केले. शासक प्रजा समान केली. नमाजसाठी शासकाला आणि काळ्या निग्रोला खांद्याला खांदा लावून उभे केले. गोऱ्यांना काळ्या इमामामागे उभे केले. सुलतानाच्या राजकन्येला झोपडीतील फकिराची बायको केले.
या ग्रंथाने स्त्री जीवनात आमूलाग्र बदल घडवले. मुलींना जिवंत राहण्याचा अधिकार दिला. आपल्या आवडीने विवाह करण्याचा अधिकार दिला. वैवाहिक नात्यातून बाहेर पडण्याचा अधिकार दिला. कमावण्याचा हक्क दिला. आपले वारस निवडण्याचा हक्क दिला. स्त्रीला पैतृक संपत्तीत अधिकार दिला.
या ग्रंथाने जगाच्या खाद्यसंस्कृतीवर प्रभाव निर्माण केला. जमिनीवर वावरणारी किंवा आढळणारी प्रत्येक वस्तू खाद्य नसते, हे संस्कार दिले. या ग्रंथाने वेशभूषा आणि बोलीभाषेवर आपली छाप सोडली. वेशभूषेला सभ्यतेच्या अलंकारांनी अलंकृत केले. भाषेला चिंतनाच्या नवकक्षा दिल्या.
सर्वात महत्वाचे म्हणजे या ग्रंथाने मानवाला 'मार्गदर्शन' दिले. या ग्रंथाने लोकांना अंधकारातून प्रकाशात आणले. मानव निर्मित धर्मांच्या अंधकारातून ईश्वरी मार्गदर्शनाच्या प्रकाशात. रमजान या ग्रंथांबद्दल कृतज्ञता बाळगण्याचा महिना. खाण्यापिण्याचा नव्हे, कृतज्ञतेचा महिना. Food फेस्टिवल नव्हे, फेस्टिवल ऑफ ग्रेटीट्युड.

Comments

Popular posts from this blog

What Does the Quran Say About Envy?

LETTER FROM A NEWLY MARRIED GIRL TO HER MOTHER